कोल्हापूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 46 हजार 781 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 816 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 58 हजार 805 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 5 लाख 46 हजार 129 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 हजार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरातच नाही तर संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा आकडा वाढत आहे. प्रशासनाने लोकांना योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनापासून संरक्षणासाठी घरी राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने जनता कर्फ्यू, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये आज सकाळी एक अजब घटना पाहायला मिळाली. दाभोळकर कॉर्नर परिसरातील वारणा दूध विक्री केंद्रावर मोफत श्रीखंड मिळत असल्याने अनेकांनी येथे रांगा लावल्या होत्या. एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असताना अशा प्रकारची घटना म्हणजे लोकांचा बेफिकीरपणाच अधोरेखित करतात.
कोल्हापुरात महापालिका प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तरीही या परिसरात मोफत श्रीखंड वाटप होत असल्याने वारणा दूध संघाच्या सभासदांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती. यावेळी सभासदांसाठी श्रीखंड वाटप सुरू असलेने आम्ही येथे ते घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांना कोणतीही परवानगी न घेता हे वाटप सुरू असल्याचे समजले. यावेळी त्यांनी लोकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. शिवाय केंद्रावरील श्रीखंडाचे वाटपही थांबवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’; काँग्रेस खासदाराची सडकून टीका
- ‘पप्पा, लवकर घरी परत या…!’ लेकीच्या आर्त हाकेनंतर सीटी स्कोअर १८ असूनही केली कोरोनावर मात !
- ‘पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून मान्यता द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- चौफेर टिकेनंतर अखेर सोशल मीडियावर 6 कोटी खर्च करण्याचा शासननिर्णय रद्द करण्याचे आदेश
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

