Share

अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे : अमित देशमुख

Published On: 

लातूर : अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत अन्नधान्य वाटप सुरु करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीप्रशासनाला दिले आहेत. कोरोना ( कोविड १९) प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे गरीब लोकांची अडचण होऊ नये याकरीता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोराेना च्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. प्रादुर्भावाची  साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडाउन तसेच संचारबंदीच्या काळामध्ये गरीब नागरिकांची अडचण होऊ नये, कोणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे.  या निर्णयानुसार अंत्योदय श्रेणीतील कार्डधारक एका कुटुंबाला एक महिन्यासाठी ३५ किलो तर प्राधान्य श्रेणीतील प्रत्येक व्यक्तींना गहू आणि तांदूळ मिळून एकूण ५ किलो धान्य मोफत देण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन तसेच संचारबंदी सुरू होऊन आता तीन ते चार दिवस उलटले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अन्नसुरक्षा लाभार्थ्यांना तातडीने मोफत धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त आयुक्त अमन मित्तल तसेच इतर संबंधित अधिकारी यांना या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन देखील या वेळी देशमुख यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या            

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!