नवी दिल्ली : डोकलामच्या संघर्षापासून चीनची दादागिरी खपवून न घेण्याची भारताची रणनिती आहे. मागच्या वर्षी लडाखमध्ये संघर्ष सुरु झाल्यापासून भारताने प्रत्येकवेळी चीनला जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने आता चीनला लागून असलेल्या सीमेवर ५० हजार अतिरिक्त सैन्यबळ तैनात केले आहे. सध्या भारताचे दोन लाख सैन्य सीमेवर लक्ष ठेवून आहेत. २०२० च्या तुलनेत ४० टक्क्याने तैनाती वाढवण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आलं आहे. यासोबत भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.
गेल्या वर्षी १५ जूनला चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला. एका बाजूला माघार घेण्याची तयारी दर्शवणाऱ्या चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या तुलनेत चीनकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. सीमेचं संरक्षण करण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी भारतीय जवान सीमावर्ती भागात तैनात असायचे. मात्र आता सीमावर्ती भागात मोठ्या संख्येनं जवान तैनात करत भारतानं प्रतिहल्ला करण्याची तयारी केली आहे.
लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही. दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून कुरापती सुरुच आहे. चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या भागात चीनने युद्धसराव सुरु केला आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणात भारत अमेरिकेच्याही पुढे, मोदींनी केले अभिनंदन
- ‘केंद्राने इंधनावरील देशवासियांकडून कर म्हणून तब्बल ४ लाख कोटी उकळले’
- ‘फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? त्यांनी ‘या’ दोन भीष्मप्रतिज्ञा मोडल्यात!’, खडसेंचा हल्लाबोल
- स्वतंत्र विदर्भासाठी लग्न न करण्याची घोषणा, तरीही केले अमृता यांच्याशी लग्न! जाणून घ्या काय आहे कारण
- ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुदतवाढ द्या’, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

