Share

राष्ट्रवादीच्या बड्या महिला नेत्याला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मी कुठेही गेले नाही, सर्व काळजी घेतली. तरीही कसा संसर्ग झाला? हे माहिती नाही. माझी प्रकृती उत्तम असल्याने मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. जिल्ह्यातील नेत्यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आता खरी कसोटी, गाफील राहू नका, उद्धव ठाकरेंचे आवाहन

मी अथवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कुठेही बाहेर निघालो नाही, तरीही हा संसर्ग झाला. बहुतेक बाहेरून घरी येणारा भाजीपाला अथवा इतर वस्तुंच्या माध्यमातून हा संसर्ग झाला असावा असा माझा अंदाज आहे. शिवाय माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दूध दरवाढ न केल्यास मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालू – पूजा मोरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!