Share

कॉंग्रेसला धक्का : चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ राज्यात काँग्रेसचं सरकार अल्पमतात

Published On: 

नवी दिल्ली- केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीच्या आगोदर घडलेल्या या घडामोडींनी एकच खळबळ उडाली आहे.

एकाच वेळी पाच आमदार गमावल्याने पुदुचेरीमध्ये काँग्रेससाठी हा जबरदस्त धक्का आहे.बुधवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुडुचेरी दौऱ्याच्या आधीच हे राजीनामे देण्यात आले आहेत. तिथे कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा भेट देणार आहेत. त्याठिकाणी ते निवडणुकीची रणनीती तयार करणार आहेत.

दुसरीकडे एनआर काँग्रेसने ७ आणि मित्रपक्ष असलेल्य एआयएडीएमकेने ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र नायब राज्यपाल किरण बेदी यांनी भाजपाच्या तीन जणांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ३० सदस्यीय विधानसभेची सदस्यसंख्या वाढून ३३ झाली होती.

गेल्या काही आठवड्यात देखील काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. यापैकी ए नमसिव्ह्यम आणि ई. थीपप्पंजन यांनी 25 जानेवारी रोजी राजीनामा दिला. दोघेही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आहेत. यानंतर सोमवारी मल्लादि कृष्ण राव आणि आज जॉन कुमार यांनी राजीनामा दिला आहे. मल्लदी कृष्णा राव यांचा राजीनामा देण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण गेल्या आठवड्यात ते नायब राज्यपाल किरण बेदी यांना हटवण्यासाठी अपील करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्ली येथे गेले होते.

ए. नमासिव्यम यांचा भाजपप्रवेश देखील कॉंग्रेसला मोठा धक्का होता,कारण पुडुचेरीचे माजी प्रदेशाध्यक्ष असणारे नमस्याव्याम यांनी राज्यातील पक्षाचा पाया मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.आता भाजप प्रवेशावेळी बरेच कॉंग्रेस कार्यकर्तेही त्यांच्यासोबत गेले आहेत.

नमासिव्यम कॉंग्रेसमध्ये नाराज होते. २०१६ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांचे नाव मुख्यमंत्री पुढे आले होते होते, परंतु ऐनवेळी नारायणसामी यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची देण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!