Share

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये नाशिक,अहमदनगर जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे धरणातील पाणी साठा 91.99% एवढा झाला आहे. यामुळे जायकवाडी चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला असल्याचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,नाथसागर (उत्तर पैठण ) कार्यालयाने कळविले आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या दरवाजा क्रमांक-10 आणि 27 मधून 1048 Cusecs तर जल-विद्युत केंद्रातून 1589 Cusecs असा एकूण 2637 Cusecs इतका विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.

पाणी विसर्गामुळे संभाव्य प्रभावित होणाऱ्या नदी काठच्या गावांना दक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करु नये, नदी क्षेत्रात विहार करु नये अथवा जनावरांना मोकळे सोडु नये. नौका विहार टाळावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!