औरंगाबाद : औरंगाबाद जालना रस्त्यावरील वरुडी फाट्यावर पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोग्य अधिकारी अमोल गीते यांच्या गाडीत रोख पाच लाख रुपये आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.
औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये अमोल गीते हे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी ते औरंगाबादहून जालना ला जात असताना वरुडी फाट्यावर पोलिसांनी त्यांच्या या गाडीची तपासणी केली. त्यामध्ये पाच लाख रुपये रोख आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यासंदर्भात बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती सुरू आहे. त्या भरतीमध्ये एका पदासाठी पंधरा हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे. तीच रक्कम घेऊन डॉक्टर गीते जालन्याला निघाले असावेत असा अंदाज आहे. कारण जिल्हाबंदी असताना आरोग्य अधिकारी यासारख्या महत्त्वाचा अधिकारी पदर स्थापनेचा जिल्हा सोडून जालन्याला कशाला निघाला होता? पोलीस तपासाचा भाग आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

