Share

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक – आबा बागुल

Published On: 

पुणे : शहरांमधील विकास कामांना चालना मिळावी व निधी अभावी आकारास न आलेले मोठे विकास प्रकल्प राबवावे. या स्मार्ट सिटी योजनेच्या उद्धेशाची पुण्यात पायमल्ली झाली असून,स्मार्ट सिटी योजने अंतर्गत आत्तापर्यंत केलेली कामे,त्यांची उपयुक्तता, लागलेला कालावधी व खर्च झालेला निधी याचे सोशियल ऑडिट करून ते पुणेकरांपुढे मांडले जावे. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले.

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन जल शुद्धीकरण व मैल शुद्धीकरण प्रकल्प ,सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी उन्नत मार्ग, रेल्वे व लोकल रेल्वेसाठी नवीन टर्मिनल्स, सोलर सिटी प्रकल्प, मुठा नदी सुधारणा असे अनेक महत्वकांक्षी व मोठ्या खर्चाचे प्रकल्प स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होणे अपेक्षित असताना फुटपाथ रुंदीकरण,वृक्षारोपण अशी पुणे महानगरपालिका करीत असलेल्या कामांची पुनरावृत्ती स्मार्ट सिटी योजनेत होत असेल तर त्याचा पुणेकरांना नक्की फायदा काय झाला हा प्रश्न पडला आहे. आणि त्या साठीच स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केलेल्या कामांचे सोशियल ऑडिट होणे गरजेचे आहे.

प्रशांत भूषण ‘तो’ दंड भरण्यास तयार!

तसेच या योजने अंतर्गत कोणते मोठे प्रकल्प हाती घेतले जावेत. यासाठी पुणेकरांचा सहभागही त्यामध्ये असला पाहिजे. केवळ चांगले मानांकन मिळावे. हा उद्धेश न ठेवता शहरासाठी आवश्यक मोठ्या खर्चाच्या मोठ्या योजना आखून त्याची पूर्तता करणे हेच स्मार्ट सिटी योजनेचे उद्दिष्ट असले पाहिजे .मात्र हे होत नासल्यामुळे सोशियल ऑडिटची मागणी केली आहे असेही आबा बागुल म्हणाले.

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे तातडीने करून मदत द्या – देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!