पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात.
गेली अनेक वर्ष ते राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. बारामती मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.
१९७८ व १९८२ मध्ये ते खासदार होते. १९७१मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळचळीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
