Share

रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत

Published On: 

मुंबई- भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काल आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

समितीची कार्य असे राहील-
आयसीएमआरने रॅपीड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफरस करणे.

या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर कराच्या याबाबत शिफारस करावी.शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !

गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना

भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादा भुसे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!