Share

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा – प्रदीप जैस्वाल

Published On: 

औरंगाबाद : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला त्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी संकटात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क माफ करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून शेतकरी संकटात सापडला आहे. उधार उसनवारी करुन शेतकऱ्यांनी त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क भरले आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने ते शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क भरु शकले नाहीत, यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावेत अशी या निवेदनात मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1208290714733334528?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1208286147668918272?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!