मुंबई : एका मुलाखतीतील अभिनेता सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. हिंदू भावना दुखावल्या गेल्यास ते सहन केले जाणार नाही.’ चित्रपटासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या एका वक्तव्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि सोशल मीडियावर #BoycottAdipurush ट्रेंड केला जात आहे. यावरच वाढत्या वादाला बगत सैफ अली खानने सगळ्यांची माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू न्हवता असं म्हटलं आहे.
सैफने स्पष्ट केलं कि, मला असं कळलंय कि माझ्या मुलाखतीमुळे प्रचंड गदारोळ पसरला आहे. आणि यामुळे लोकांच्या भावनाही दुखावल्यात कुणाला दुखावण्याचा माझा हेतू न्हवता किंवा मला असं काही म्हणायचं न्हवत मी मनापासून माफी मागत. आणि माझं वक्तव्य मागे घेतो. प्रभू श्रीराम कायमच माझ्यासाठी शक्ती आणि सामर्थ्याच प्रतीक आहेत. आदिपुरुषच्या माध्यमातून दुर्जनांवर सज्जनांचा मोठा विजय दाखवला आहे आणि संपूर्ण टीम याच दृष्टीने काम करत आहे. यात कुठलेही बदल नाही असं सैफने स्पष्ट केलं आहे.
मुलाखतीदरम्यान सैफ म्हणाला होता कि, ‘राक्षसी राजाची व्यक्तिरेखा साकारणे मनोरंजक आहे, परंतु तो इतके क्रूर नव्हता. रावण हा माणूस म्हणून कसा होता? याचे चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले, हे सर्वांनाच माहिती आहे.
परंतु, या युद्धालाही एक पार्श्वभूमी आहे. श्री रामाच्या धाकटा भाऊ लक्ष्मण यांनी रावणाची बहीण सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यांनतर हे युद्ध होणारच होते. रावणची विचारसरणी काय होती? हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्यासमोर घेऊन येणार आहोत, असे सैफ मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.
यावरच राम कदम यांनी यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ‘तान्हाजी-द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची देखील आठवण करून दिली. राम कदम म्हणाले की, ‘जे हा सिनेमा बनवत आहेत, ओम राऊतजी, त्यांनी याआधी तान्हाजी हा सिनेमा बनवला होता. त्यामध्ये ज्याप्रकारे हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या सिनेमातही त्यांना हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचा सन्मान त्यांना करावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर केंद्रातील मोदी सरकार आहे’
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- ‘विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना करा’
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला आपण मुकलो’

