Share

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी पोहचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार, महाविकासआघाडीच्या बैठकीत निर्णय

राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे.

#Corona : पुण्यात एकाच दिवसात आढळले २०२ रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ३२९५ वर

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

पुणे विभागात 10 हजार 41 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 61 हजार 179 मजुरांना भोजनाची सोय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!