टीम महाराष्ट्र देशा : पुणे महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या हक्कासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी पुढे सरसावले आहेत. ६० वर्षांपासून पुणे महापालिकेची सेवा करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कामगार बेघर करून शहरातील मोक्याचे भूखंड बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालायचे प्रयत्न सुरु असल्याचा,आरोप गणेश सातपुते यांनी केला आहे.
यावेळी सातपुते म्हणाले की, ६० वर्षांपासून पुणे महापालिकेची सेवा करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कामगार बेघर करत आहेत. तर रिकामे झालेले मोक्याचे भूखंड बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातले जात आहेत.
तसेच शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला धोकादायक इमारतींचे शिक्के मारून त्या सर्व इमारती बळजबरीने रिकाम्या केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जर अनधिकृतरित्या राहणाऱ्या परप्रांतीयांच्या झोपड्यांना शासन संरक्षण देतं असेल तर ह्याही सर्व सदनिका चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नावावर करायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

