टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. सत्तेसाठी केजरीवाल कॉंग्रेसच्या जवळ जात आहे त्यामुळे अण्णांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.
अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या भूमिकेवर बोलताना. ‘भ्रष्टाचारी काँग्रेसच्याविरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. मात्र त्याच काँग्रेससोबत अरविंद केजरीवाल आज हातमिळवणी करत आहेत’. तसेच, सत्ता आणि पैशासाठी वाटेल त्या तडजोडी करणं हे दु:खदायक असून राजकारणाची ही घसरती पातळी आहे असं अण्णांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, २०१२ साली अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र येत आंदोलन केले होते परंतु आज अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात मतभेद आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

