औरंगाबाद : संचार बंदी मुळे रोज मोलमजुरी करून आपले पोट भरणाऱ्यांना आता १४ एप्रिल पर्यंत पोट कसे भरायचे असा मोठा प्रश्न पडलेला असतांना शहराचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी अशा गोर-गरिबांना अन्न मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच योजना राबवण्याची जबाबदारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली आहे.
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात लोकडाऊन असून सगळे काम काज ठप्प आहे. अशा वेळी नौकरदारांनी आपल्या घरात महिना भराचा किराणा भरून ठेवला आहे. मात्र रोजच्या मजुरीवर जीवन असलेल्यांना दोन वेळच्या अन्ना साठी झगडावं लागतंय. रोज दिवसभर काम करून दिवसाची शंभर-दोनशे मजुरी मिळाली कि रोजच्या जीवनावश्यक वस्तू घरी येणाऱ्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. ज्या कुटुंबांची रोजच्या मजुरीशिवाय चुल्ही पेटत नाही अशा परिवाराने काय करायचं असा प्रश्न आस्तिककुमार पाण्डेय यांचा पडला होता. यावर उपाय म्हणून महापालिकेमार्फत अशा कुटुंबांना जेवण देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आणि यासाठी आपला व आपली पत्नी मोक्षदा पाटील यांचा एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार तर नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन यासाठी घेतले जाणार आहे.
या अन्नदानाच्या उपक्रमात महापौरही मोठा वाट देणार आहेत आणि आनंदनेची जबाबदारी देखील त्यांनी स्वकारली आहे. यासार्वांची मिळून किती रक्कम ज्माहोते हे बघून हे काम एका केटर्सला देण्यात आले आहे. तसेच वार्ड कार्यालयानुसार याची वाटप होणार आहे. यामुळे अशा कुटुंबाना मोठा दिलासा मिळणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

