नवी दिल्ली : गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. आता घरबसल्या गुगलवरून खाद्यपदार्थाची ऑर्डर देता येणार आहे. कारण गुगल लवकरच भारतात फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार आहे.
कंपनीने भारतात फूड डिलिव्हरी सेवेच्या चाचणीलाही सुरुवात केली आहे. google.com ऑर्डर ग्राहकांना ऑर्डर आणि पेमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. सध्या गुगलतर्फे मेन्यू, किंमत आणि अन्य बाबींवर विचार करण्यात येत आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवेमध्ये गुगलचा प्रवेश गेमचेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तसेच गुगलमुळे स्विगी आणि झोमॅटोला देखील टक्कर मिळण्याची शक्यता आहे. असे वृत्त लोकमतने दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही नुकतीच देशात फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीने बंगळूरूच्या काही भागात ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. तर अमेरिकेत सध्या गुगलची खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरू आहे. व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटच्या मदतीने ग्राहकांना ऑर्डर करण्याचा ऑप्शन देण्यात येत आहे.
कोरोना टेस्ट शिवाय दुकान उघडता येणार नाही,औरंगाबाद महानगरपालिकेचे आदेश
गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्यांनी सतर्क राहावे
राजस्थान पाठोपाठ आणखी एका राज्यातील सरकार झाले अस्थिर,कॉंग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

