Share

राजस्थान पाठोपाठ आणखी एका राज्यातील सरकार झाले अस्थिर,कॉंग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Published On: 

रांची- राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. सचिन पायलट आणि १८ बंडखोर काँग्रेस आमदारांनी गुरूवारी आपली आमदारकी वाचविण्यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

आता हा पेच न्यायालयात गेला आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.या याचिकेवर न्यायमूर्ती सतीश चंद शर्मा निर्णय देतील. या प्रकरणात सचिन पायलट गटाच्या वतीने हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी बाजू मांडतील.

हे सर्व एका बाजूला सुरु असतानाच तिकडे झारखंडमध्येही सरकार अस्थिर झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या आमदारांना पद आणि पैशाचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि वित्तमंत्री डॉ. रामेश्वर उरांक यांनी केला आहे.

राजस्थाननंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपने आपला मोर्चा झारखंडकडे वळवत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉँग्रेसच्या चार आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचे रामेश्वर उराव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!