🕒 1 min read
मुंबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश हे शेजारी असले तरी त्याच्यांतील राजकीय वादामुळे ते एकमेकांचे प्रतिद्वंदी बनले आहे. यात क्रिकेटच्या मैदानात जेव्हा हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकासमोर येतात तेव्हा हा केवळ सामना उरत नाही. तर ही अस्तीत्वाची लढाई असते, धर्मयुद्ध असते.
यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची घोषणा झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान संघाचा एकाच गटात समावेश करण्यात आला. यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट सामना रंगणार हे नक्की झाले होते. आता केवळ प्रतिक्षा होती ती तारखेची. यादरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आगामी टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामना हा २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र या वृत्ताला अद्यापही आयसीसीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मात्र जर हा सामना याच तारखेला झाला तर भारतात दिवाळीपुर्वीच फटाके फुटणार हे नक्की.
कारण विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही भारत विजयी होणार हे प्रत्येक भारतीय ठामपणे सांगु शकतो. गेल्या काही वर्षापासून दोन्ही क्रिकेट संघ एकमेकाविरोधात क्रिकेटच्या मैदानात केवळ आयसीसीच्या मालिकेत भीडत असतात. त्यामुळे दोन्ही देशाचे क्रिकेट रसीक या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिल्या कसोटीपुर्वी अँडरसनने दिला टीम इंडियाला इशारा, म्हणाला ‘हिशोब चुकता करणार’
- सामना एक, विश्वविक्रम तीन! ऑलिम्पिक स्पर्धेतील एक विलक्षण योगायोग
- केंद्रीय विद्यालयात खासदारांना देता येणार फक्त दहा प्रवेश, इतर सर्व कोटे रद्द
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
