टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधाऱ्यांसह विरोधीपक्षांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेलखंडी मठ जमीन प्रकरणात औरंगाबाद खंंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आज मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबेजोगाई तालुक्यातील बरदापुर पोलीस ठाण्यामध्ये धंनजय मुंडें विरोधात 420, 468, 465, 464 आणि 471 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या सुटीतील खंडपीठाने मुंडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

