🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातचं आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी देवरांनी आपल्या प्रचारात शिवसेने विरोधात धर्माचा आधार घेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता पथकातील अधिकारी नरेंद्र परमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
FIR registered against Congress candidate from South Mumbai Milind Deora under section 171 of IPC ( giving false statements for elections) and section 125 of the presentation of people's act ( promoting enmity between classes in connection with elections). (file pic) pic.twitter.com/vlGe3433kA
— ANI (@ANI) April 21, 2019
काय म्हणाले होते देवरा ?
देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात देवरा यांनी बोलताना शिवसेनेने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात त्यांच्या मंदिराबाहेर मांस शिजविले होते. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकवला पाहिजे, असे सांगत भडकाऊ भाषण केले होते. याबाबत सनी जैन आणि धर्मेंद्र मिश्रा या उच्च न्यायालयातील वकिलांनी आचारसंहिता पथकाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता पथकाने देवरा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र पाठवले होते.
#WATCH Mumbai Congress President Milind Deora in Mumbai y'day,says, "Shiv Sena has been against the minorities.Few yrs ago,the party insulted Jain religion by cooking meat outside Jain temples during Paryushana festival. Remember,you have to teach them lesson through your votes." pic.twitter.com/FO6sBqVwti
— ANI (@ANI) April 3, 2019
कोण आहेत मिलिंद देवरा ?
देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबईत 2014 साली शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

