Share

आजारी प्रवाशास शिवीगाळ करणाऱ्या स्मार्ट सिटी वाहकाला दंड; युवक काँग्रेसने केली होती तक्रार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आजारी प्रवाशास आई-बहिणीवरून शिवीगाळ तसेच मारायची भाषा केल्याबद्दल स्मार्ट सिटी बसच्या महिला वाहक एस. एस. गोरे व चालक यांना अखेर एसटी महामंडळाद्वारे दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेसच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे स्मार्ट सिटी बसची सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे.

१ सप्टेंबर रोजी सिडको ते माळीवाडा या स्मार्ट सिटी बसमध्ये बाबा पेट्रोल पंप ते पडेगाव दरम्यान महिला कंडक्टर एस.एस गोरे व चालक या दोघांनी मिळून आजारी प्रवाशास शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली होती. प्रवाशाची तब्येत खराब असल्या कारणाने त्या प्रवाशाने महिला वाहक एस. एस. गोरे व वाहक या दोघांना बस थांबवण्याची विनंती केली होती. परंतु महिला वाहक एस.एस गोरेने एका प्रतिष्ठित व्यक्तीला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली असता त्यासंबंधीची तक्रार युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मयूर साठे, राज्य प्रवक्ता डॉ.निलेश आंबेवाडीकर, जिल्हा महासचिव गुरमीतसिंग गिल यांनी विभाग नियंत्रकांना केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी विभागीय चौकशी केली असता महिला बस वाहक आणि चालक या दोघांना प्रत्येकी शंभर रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या घटना प्रवाशांसोबत दररोज घडत असून एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालक यांच्या उर्मटपणामुळे एसटी तोट्यात चालली आहे. यापुढे जर असे प्रकार थांबले नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मयूर साठे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!