Share

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत; तर जखमींवर मोफत उपचार

Published On: 

मुंबई : मुंबईमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जीर्ण व धोकादायक इमारतींमधील रहिवास्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. दरम्यान, मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास इमारत कोसळून दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये वृद्धांपासून ते लहान बालकांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयात हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!