मुंबई : मुंबईमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जीर्ण व धोकादायक इमारतींमधील रहिवास्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. दरम्यान, मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास इमारत कोसळून दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. आधीच मुंबईची तुंबई झाल्याने भाजपने महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्यातच या दुर्घटनेनंतर भाजपने पुन्हा एकदा शिवसेना व मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.
भाजपच्या टीकेला शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. ‘भाजप काय म्हणतंय ? भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम,’ असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी काढला आहे. यामुळे पेडणेकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहा ते बारा जणांच्या टोळक्याने घर खाली करण्यासाठी केली भाडेकरूला मारहाण
- आर अश्विनच्या ट्विटला मांजरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्यास शेणा-मुताने अंघोळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर का आली ?
- अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर छापा, दोन लाख ९३ हजाराचे साहित्य जप्त
- नुकसान भरपाई देण्यास नकार, पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव


