अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मागील महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधून अहमदनगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. माजी दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर पोकळी भरुन काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजीवनी देणारा आहे. शंकरराव गडाख आता शिवसेनेत सक्रीय होऊ लागले असून, जिल्हाभर बैठकांचे नियोजन त्यांनी केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील शिवसेनेमध्ये गटबाजी दिसत होती. गडाख यांनी नगर शहर शिवसेनेची शुक्रवारी सकाळी सोनई येथे बैठक घेऊन प्रत्येकाची मते ऐकून घेतली. या बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, माजी आमदार विजय औटी, नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, यांच्यासह नगरसेवक व शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांना बुडाखाली आग लागल्यावर ‘मराठी अस्मिता’ आठवते
अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनीच मंत्री गडाख यांनी शिवबंधन हाती बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यासाठी शिवसेनेला आयता नेता मिळाला. मात्र ते सक्रीय कधी होणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसैनिकांची प्रतिक्षा संपुष्टात आली. मंत्री गडाख यांनी सक्रीय होत तालुकानिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिली बैठक नगर शहरातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी सोनई येथे झाली.
शिवसेना मुद्दाम ‘त्या’ प्रसिद्धीच्या जाळयात अडकत आहे ; मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप


