मुंबई : सुप्रीम कोर्टाने राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शाळेतील १५ टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोरोना काळात केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील फी कपातीचे संकेत दिले होते.
दोन आठवड्यांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत फी कपातीच्या निर्णयाला मंजुरी देखील देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अधिसूचनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देखील अध्यादेश म्हणजेच जीआर न काढण्यात आल्याने विरोधकांनी आज राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच, फी कपातीवरून मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे देखील बोलले जात होते.
अखेर फी कपातीच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. जीआरनुसार आता 2021-2022 या शैक्षणिक वर्षात 15 टक्क्यांची फी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्यांना शाळेकडून 15 टक्के फी परत मिळेल. त्यामुळे पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी! केंद्र सरकार काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या मालमत्ता परत करणार
- शहरात फोफावत आहे साथरोग; मलेरिया, डेंग्यू, काविळ आजारांचा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

