Share

‘ई-पास’ पूर्णपणे बंद करावा यासाठी जनहित याचिका दाखल

Published On: 

मुंबई-सध्या राज्यभर ई-पास चा गोंधळ सुरु आहे. प्रवासासाठी ई-पास सक्तीचा आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना ई पास मिळत नाही आणि एजन्ट मार्फत गेले तर लागेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, अशी विनंती असलेली जनहित याचिका आज भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी राज्य सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

गेले काही महिने सर्वसामान्य जनतेला एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात वाहनाने प्रवास करण्यासाठी ई पास सक्तीचा करण्यात आला आहे. परंतु अनेक वेळा मेडिकल इमर्जन्सी, नातेवाईकांचे मयत, व्यावसायिक मीटिंग अशी अत्यावश्यक कारणे देऊन सुद्धा ईपास मिळत नाही. कधी एखाद्या सध्या क्षुल्लक कारणासाठी पास मिळतो, कधी तसाच पडून राहतो तर काही फालतू कारण देऊन रिजेक्ट केला जातो. ईपास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी सिस्टम मध्ये कोणताही योग्य समन्वय नाही, असे दिसून आल्याचे मत मयुरेश जोशी मांडले.

”ई पास च्या या गोंधळात दलालांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. यासाठी सोशल मीडिया वर या लोकांनी चक्क जाहिराती दिल्या आहेत, आणि १००० ते ५००० रुपये घेऊन हे दलाल लोक तुमचा पास दुसऱ्या दिवशी आणून देतात. सामान्य माणसाला पास मिळत नाही, मग एजंटला कसा काय मिळतो? हे दलालांचे मोठे रॅकेट असून राज्य सरकारमधील कोणत्यातरी मोठ्या मंत्र्यांचा यासाठी राजाश्रय आहे का?”, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

गौरी गणपती उत्सव जवळ आला आहे, लोकांना कोकणात किंवा त्यांच्या गावाला जायचे आहे. त्यात रोज नवीन गोंधळ निर्माण करणारे आदेश राज्य सरकार मार्फत काढले जात आहेत. या प्रकरणात भाजपा च्या अनेक आमदारांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात अनेक वेळा पत्रे लिहिली आहेत, परंतु कोणालाच उत्तर मिळाले नाही. शेवटी जनतेला या इ-पास च्या त्रासातून सुटका करून देण्यासाठी ठाकरे सरकारविरुद्ध आम्हाला आता कायदेशीर लढाई लढावी लागत आहे, असे मयुरेश जोशी यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या- 

धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानं हर्ट झालीय ‘ही’ अभिनेत्री 

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला, भिडे पुल जाणार पाण्याखाली!

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!