Share

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला, भिडे पुल जाणार पाण्याखाली!

Published On: 

पुणे : मागील काही दिवसांपूर्वी खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर या मौसमतील पहिला विसर्ग मुठा नदीमध्ये सुरु करण्यात आला होता. यानंतरही धरणक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे विसर्ग तब्बल १६ हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रातील वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्यासोबतच नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

तर, खडकवासला धरण साखळीतील पानशेत धरण देखील पूर्णक्षमतेने भरल्यामुळे मुठा नदीमध्ये विसर्ग करण्यात येत होता. यानंतर गेल्या २ दिवसात पावसाचा जिल्ह्यासह शहरात जोर ओसरल्यामुळे विसर्ग साडेतीन हजार क्युसेक वेगापर्यंत कमी करण्यात आला होता. मात्र, काल रात्रीपासून धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून धरणसाठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा हा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्त्यांसह बाबा भिडे पुल पाण्याखाली जाणार आहे.

‘ते’ 18 कोटी पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता

आज सकाळीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये तब्बल १६ हजार २४७ क्युसेक वेगापर्यंत वाढवण्यात आला आहे. याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. “खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा जोर वाढल्याने मुठा पात्रातील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेकपर्यंत वाढवला असून यामुळे बाबा भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली जाणार आहे ,” असे ट्विट त्यांनी केले असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील केले आहे.

राज्यात तब्बल १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर कोरोनामुक्तांचे प्रमाण झाले ‘इतके’!

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असून धरण ८२.४२ टक्के इतके भरले आहे. या धरणातील पाणीसाठ्यात आतापर्यंत ४७.१३ टक्के एवढी वाढ झाल्याचे पिंपरी-चिंचवड मनपाचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.

‘ते’ 18 कोटी पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता

खडकवासला साखळी धरण प्रकल्प पाणीसाठा(२१ ऑगस्ट, स. ६ पर्यंत)

खडकवासला : १.९७ टीएमसी/१००%

पानशेत : १०.६५ टीएमसी/१००%

वरसगाव : ११.९६ टीएमसी/९३.२७%

टेमघर : २.८५ टीएमसी/७६.७७%

एकूण पाणीसाठा : २७.४२ टीएमसी/९४.०८%

(गेल्या वर्षी आजच्या दिवशी : २९.०५ टीएमसी/९९.६६ %)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!