Share

करकरेंं बद्दलचे वक्तव्य साध्वीला भोवणार, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल !

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशातील भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी आता चर्चेचा विषय बनली आहे. तर आता दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हीने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले आहे. तर या वक्तव्याची सामाजिक आणि राजकीय स्तरातून निंदा केली जात आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाली की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वक्तव्याची चौकशी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

https://twitter.com/ANI/status/1119182172932444160

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!