Share

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.

मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. यावेळी परभणी मतदारसंघातील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. लोकसभा निवडणुकीत परभणीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा नेमका कुणामुळे पराभव झाला, या मुद्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये ही वादावादी झाली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद थांबला आहे.

दरम्यान, या बैठीकीला राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!