टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतच वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्त वाहिनीने दिलं आहे
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात वास्तव्यास नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या खाजगी ‘मातोश्री’ या निवासस्थानी राहतात. काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
आता ‘वर्षा’वरील संबंधित महिला पोलीस अधिकारी झोन-२ मधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी त्यांची ड्युटी वर्षा बंगल्यावर लागली होती. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.
हेही पहा –


