🕒 1 min read
Lipstick Under My Burkha- ‘लिपस्टिक अंडर माई बुर्का’ ला ‘ए’ प्रमाणपत्र सोबत रिलीज करण्यास परवानगी मिळाली आहे. एफसीएटी (फिल्म सर्टिफिकेट अपील ट्रिब्यूनल) ने सेंसर बोर्ड ला हि परवानगी देण्यास सांगितले.
प्रकाश झा च्या या सिनेमाला सेंसर बोर्ड ने सर्टिफिकेट देण्यास मनाई केली होती. या चित्रपटात महिलांच्या आयुष्यातील घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये बोल्ड दृश्य, अपमानजनक शब्द आणि अश्लिल ऑडिओ असल्याचं सेंसर बोर्डचं म्हणणं आहे. तसंच हा चित्रपट एका विशिष्ट समाजाप्रती असंवेदनशील असल्याचं सेंसर बोर्ड ने सांगितले होते.
सेंसर बोर्ड च्या निर्णयच्या विरोधात निर्माते प्रकाश झा ने एफसीएटी तक्रार दिली होती.
चित्रपटात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोरा हे चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहे. मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक पद्धतीवर हा चित्रपट भाष्य करतो. मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला लैंगिक समानतेवर भाष्य केल्याबद्दल ऑक्सफेम पुरस्कार देण्यात आला होता.
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सर्टिफिकेट देणार नाही : सेन्सॉर बोर्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
