Share

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत सर्वांच्या विचाराने आणि एकमताने 77 वर्षीय दिब्रिटो यांचे नाव निश्चित केले आहे.

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबाद येथे होणार आहे. 10 ते 12 जानेवारी 2020 मध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष पद यंदा साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे भूषवणार आहेत.

मराठवाड्यात यंदाचे साहित्य संमेलन होणार असल्याने या भागातील साहित्यिकाला अध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळेल अशी आशा होती. त्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ आणि साहित्यिक रा. रं. बोराडे यांची नावं शर्यतीत होती.

कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो ?

दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. तसेच त्यांनी साहित्यातही विशेष कामगिरी केली. आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव),तेजाची पाऊले (ललित), नाही मी एकला, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास इ. साहित्य फादर दिब्रिटो यांचे प्रसिद्ध झाले आहे.

https://twitter.com/Maha_Desha/status/1175709167069216768?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1175705078377795584?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!