औरंगाबाद : परतीच्या पावसमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसाणीची शेतकरी कोलमडून गेला आहे. जून महिन्यात पावसानं शेतकर्यांना दिलासा दिला खरा मात्र आता याच आतिवृष्टीने जोमत आलेल्या खरीप पिके अक्षरशः पावसात वाहून गेली आहेत. त्यामुळे खरीप पिकांच्या भारवशावर असलेला शेतकरी मात्र पुरता खचून गेल्याच चित्र दिसून येत आहे. या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान झाले असून विदर्भात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपीक, तर कोकणात भाताचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यासाठी औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन केलं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजीपाला फेकत आंदोलन केले. जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील अद्याप शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत आंदोलनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे खराब झालेल्या भाजीपाला तसेच समोर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसोबत खराब झालेल्या भाज्यांची आरती करत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काढले पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या
- नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामा न करता ७५ हेक्टरी मदत द्या.
- जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
- फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये तातडीची मदत द्यावी.
- यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिके उभे करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ मदत करावी.
- कृषी पंपाचे सरसकट सर्व वीज बिल माफ करावे.
- तसेच खरीप हंगामासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बँकांनी दिले संपूर्ण पीक कर्ज माफ करावे.
महत्वाच्या बातम्या-
- मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?
PROMOTED CONTENT


