Share

लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर जाहीर टीका करत आव्हान दिलं होतं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या धनंजय मुंडे यांना एका शेतकऱ्याने लिहलेले पत्र सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे.हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

धनंजय मुंडे याचं ट्वीट  

राज्यातील महामार्गासाठी लागणा-या शेतक-यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ येणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा आम्ही कदापीही संमत होऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर एका शेतकऱ्यांने त्यांना पत्र लिहिलं आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलं आहे.

शेतकरी मुंजा गित्ते यांचं पत्र जसेच्या तसे  :

प्रति

मा.धनंजयजी मुंडे

मा.महोदय

सोशल मिडीया मधुन काल तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी जीव देण्याची तयारी दाखवली असल्याचे वाचन्यात आले.

वाचल्यानंतर अतिशय भावविवश झालो.

आता तुमच्या मतदारसंघातील माझ्यासारख्या व्यक्तीने शेतजमिन वाचवण्यासाठी तुमच्याकडेच दाद मागीतली पाहीजे असा निर्धार करुन हे निवेदन तुम्हाला ऊद्देशुन पुर्ण शुद्धीत व कुणाच्याही दबाव अमिषाला भिक न घालता लिहीत आहे हे सुरुवातीलाच नमुद करतो.

महोदय,

परळी तालुक्यातील अनेक वर्षांपासुन नियोजीत संत जगमित्र साखर कारखान्यासाठी आपण माझी पुस शिवारातील गट नं.36 मधील 3 हेक्टर 12 आर इतकी जमिन खरेदी केली मात्र त्याचा मोबदला दिला नाही.

मोबदला देण्यासाठी खेटे घातल्यानंतर आपण चाळीस लाखांचा खोटा चेक देऊन फसवणुक केलीत.

कारखाना सुरु करुन माझ्या कुटुंबातील चार पाच जणांना नोकरी देण्याचे आश्वासन तर कारखाना कागदोपत्रीच राहील्याने कधीच पुर्ण होणार नाही हे ही स्पश्ट आहे.

सदरील प्रकरणी आपण व आपल्या गुंडांनी मला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देऊन दबाव आणला असला तरी न्यायालयीन प्रक्रीयेवर विश्वास ठेवुन मी व माझ्यासारखे अनेकजण तुमच्या जमीन हडपण्याविरुद्ध कायदेशीर लढा लढत आहोत.

याच जगमित्र कारखान्यासाठी म्हणुन अशाच पद्धतीने बनाव करुन आपण श्रीमती पार्वतीबाई रंजित गिरी या 90 वर्षीय वृद्धेचीही लुबाडणूक केल्याचेही प्रकरण न्यायाच्या प्रतिक्षेत असुन सदरील महिलेने काही महिन्यांपुर्वी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येची प्रशासनाकडे परवानगी मागीतली आहे.

आपले कालचे शेतकऱ्यांच्या जमिनीविषयीचे निवेदन वाचुन शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आपल्या जीव देण्याच्या प्रतिज्ञेवरुन आम्हाला तुमचे मतपरिवर्तन झाल्याची खात्री वाटत आहे.

तरी आपण जगमित्र साखर कारखान्याच्या नावाने लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन आपल्या प्रतिज्ञेला जागुन परत करुन महाराष्ट्रापुढे आदर्श ऊभा करावा ही कळकळीची हात जोडुन विनंती.

या आमच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्यास माझ्या सारख्या अनेक कुटुंबांवर जीव देण्याची आलेली वेळ टळेल .

कळावे..

मुंजे किसन गित्ते, रा. तळणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!