Share

भाडेतत्त्वावर जमीन घेतली आणि एका रात्रीत शेतकरी मलामाल; अचानक धनलाभाची कथा !

Published On: 

भोपाळ : अनेकदा धनलाभाच्या मोहामुळे लोक गुप्तधान खोदकामाच्या मागे लागतात. यामध्ये अनेकदा अपघात घडल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याचे देखील घटना घडतात मात्र अचानक धनलाभ झाल्याने कोणाचं नशिब कधी बदलेन काही सांगता येत नाही. असाच एक अजब प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे. एका रात्रीत मध्य प्रदेशात राहणाऱ्या शेतकऱ्यांचं नशिब बदललं आहे. अवघ्या दोन दिवसांच्या भाकरीसाठी रात्रंदिवस काम करणारा शेतकरी एका क्षणात लक्षाधीश झाला आहे. खरंतर, पन्ना जिल्ह्यातील 45 वर्षीय शेतकरी लखन यादव याला त्याच्या जमिनीवर एक हिरा सापडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या हिऱ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने हिऱ्याची चौकशी केली असता तो मौल्यवान असल्याचं लक्षात आलं. यानंतर शनिवारी खनिज विभागाने 60.6 लाख रुपयांमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला आहे. ते झालं असं की, गेल्या महिन्यात लखन यादव यांनी 200 रुपये भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली होती. लखनला त्याच्या जमिनीवर काही चमकणारी वस्तू दिसली ज्यामध्ये खोदताना 14.98 कॅरेटचा हिरा सापडला.

‘या हिर्याने माझे आयुष्य बदलले आहे, हा क्षण कधीही विसरणार नाही’ असे मनोगत हा हिरा सापडल्यांनंतर लखन यांच्या म्हणण्यानुसार, या हिऱ्याने माझे आयुष्य बदलले आहे. मी जेव्हा शेतात काहीतरी चमकताना पाहिलं तेव्हा तो क्षण मी कधीही विसरणार नाही. हिऱ्यावरची धूळ काढल्यानंतर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. खरंतर, हिरा पाहिल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड सुरू झाली होती. यानंतर लखनने त्याची ही कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली होती. नेटकऱ्यांनी याला खूप पसंती दिली आहे. त्याचा एक फोटोही यामध्ये व्हायरल झाला आहे. आता या पैशांचं काय करणार असा प्रश्न विचारला असता मी अशिक्षित आहेत. त्यामुळे मी माझ्या चार मुलांचे चांगले शिक्षण करण्यासाठी या पैशांचा वापर करणार असल्याचं लखन म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!