Share

देण्याची दानत फक्त शेतकऱ्याचीचं, गरजूंसाठी केलं सगळं ‘वावर’ खुलं

Published On: 

नाशिक : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यात आपल्या राज्यावर देखील मोठ संकट ओढवलं आहे. अशात कोरोना विरोधात ही लशी लढण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अनेक नागरिक आपला हातभार लावत आहेत. मात्र सगळ्यात नाशिकच्या एका शेतकऱ्याने गरजूंसाठी थेट आपल शेतच खुल करून दिल आहे. त्यामुळे ‘वावर आहे तर पॉवर आहे’ ही उक्ती सत्यात उतरताना दिसत आहे.

नाशिकमधील शेतकरी दत्ताराम पाटील यांनी आपल्या शेतातील तीन एकर जमिनीपैकी एका एकरवर पिकलेला गहू गरजू व्यक्तींना दान करण्यास सुरुवात केली आहे. दत्ताराम पाटील सपत्नीक आपल्या शिवारात उभं राहून गरजूंना गव्हाचं वाटप करत आहेत.

निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील दत्ता पाटील यांनी आज त्यांच्या शेतातील गव्हाची रास गावातील गोरगरीब व हातमजुरांना खुली करून दिली. कोरोनामुळे कसबे-सुकेणे येथील सर्व गोरगरीब जनतेचे अर्थचक्र ठप्प आहे. द्राक्ष खुडे, शीतगृहे, निर्यात केंद्रे बंद असल्याने कसबे सुकेणेतील मजुर वर्गाचे हाल होत आहेत.

दत्ता पाटील यांच्या शेताजवळ एक वस्ती आहे. या वस्तीवरील काही कुटुंब अन्नधान्य संपल्राने उपाशी झोपत असल्याचे दत्ता पाटील यांना समजले. त्यांनी तत्काळ शेतात जाऊन नव्याने काढलेल्या गव्हाची रास या कुटुंबांना खुली करून दिली. कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता सूचनांचे पालन करत सुरक्षित अंतराने गव्हाचे वाटप सुरू केले आहे.

‘मी लहानसा शेतकरी आहे. आम्ही काही आर्थिकदृष्ट्या फार संपन्न नाही, पण आमच्याकडे एक चपाती-भाकर असेल, तर त्यातील अर्धी गरजूंना देऊच शकतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दत्ता पाटलांची माणुसकी आणि सेवाभाव पाहून या कुटुंबांना अश्रू अनावर झाले. तर दत्ताभाऊंना दान करतानाही समाधान वाटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!