Share

दहावीला ९४ टक्के गुण तरीही अॅडमिशनची चिंता, शेतकरी मराठा कुटुंबातील विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाले कि नाही, या चिंतेने शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव अक्षय शहाजी देवकर असून तो कळंब तालुक्यातील देवळाली गावचा आहे.

अक्षयचे वडील शहाजी देवकर हे शेतकरी असून देवळाली गावात त्यांची पाच एकर शेती आहे. शाळेमध्ये हुशार असणाऱ्या अक्षयला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्याने दहावीमध्ये अथक परिश्रम घेत 94 टक्के गुण मिळवले होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना. त्यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परीस्थितीवर मात करून आपल्या मुलाला माध्यमिक शिक्षणासाठी लातूर येथे ठेवले.

दरम्यान, दहावीमध्ये ९४ टक्के गुण मिळवल्यानंतर हि अक्षय तणावात दिसत होता. यामध्येच त्याने नैराश्येतून आपल्या राहत्या घरी गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. दरम्यान, मराठा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित संभाजीराजे यांनी भूमिका मांडली आहे.

विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खा. संभाजीराजे संतापले

उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता, त्याचप्रमाणे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरु शकत नसल्याने निराश होऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. आरक्षणामुळे मराठा समाजाची होत असलेली घुसमट पुन्हा एकदा समोर आली आहे.

समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. ‘योग’ करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत ? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय ?
भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां ? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे ? नाहीतरी आज एक एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा ? त्याच्या आयुष्याची ही तर खरी सुरुवात होती.

गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्या मुळे आपलं आज जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित कां वाटतंय ? कां म्हणून ते स्वतःला संपवत आहेत.

मला वाटतंय की आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष आहे. मराठा समाजासहित, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे आहेत.

यामध्ये नेत्यांसोबत प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. त्यांची सुद्धा समाजहितासाठी जगण्याची तयारी पाहिजे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये’ असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते, ते आजही तंतोतंत खरे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!