🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत. आता याच यादीत आणखीन एक अभिनेत्याचे नाव सामील होणार आहे. तो अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो आहे फरहान अख्तर.
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सध्या मॉडल शिबानी दांडेकरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. अधुना भबानीसोबत घटस्फोट झाल्यानंतर फरहान- श्रद्धा कपूरसोबतचे नाते चर्चेत होते.फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या दोघांनीही आपलं नातं कधीच लपवलेलं नाही. त्यांचे प्रेम करतानाचे अनेक फोटो इंटरनेटवर सापडतील.
२०००मध्ये फरहान व अधुना विवाहबंधनात अडकले होते. पहिल्या पत्नीपासून फरहानला दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्न झालेला असतानाही फरहानचे कोणासोबत तरी अफेयर होते. याच कारणामुळे त्याचे लग्न तुटले. पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला.
फरहान व अधुनाचा संसार १५ वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे.फरहान अख्तरने भाग मिल्खा भाग, दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता त्याचा आगामी चित्रपट तुफान २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.".
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
