मुंबई : देशात आतापर्यंत १२५ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर तीन मृत्यू झाले आहेत. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता सेलिब्रेटी देखील विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर झालाय. यामुळे या व्हायरसचा सामना संपूर्ण जग करतंय. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना करोना विषाणूपासून वाचण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत. जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनीही दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
दिलीप कुमार यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं की , ‘करोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.’ दिलीप कुमार यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1239617934319730688?s=20
तर दुसऱ्या बाजूला टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीनंतर जेम्स बाँड फेम अभिनेत्री ओल्गा क्युरलेन्को हिलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः ओल्गाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. तसेच या विषाणूला गांभीर्याने घ्या असाही संदेश तिने यावेळी दिला. ओल्गाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिला करोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. ओलेगाने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्ड सिनेमात काम केले होते.
दरम्यान, टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याने स्वतःचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि तो करोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान,कोरोनामुळे मनोरंजन विश्वालाही मोठा फटका बसला असल्याचं दिसून येत आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचं परदेशी होणारं चित्रीकरण रद्द झालं आहे. राज्यातील विविध भागात चित्रपटगृह बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडला ८०० कोटींचा फटक बसला असल्याचं वृत्त मुंबई मिररनं प्रकाशित केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

