Share

सर्वांच्या लाडक्या ‘या’ अभिनेत्रीलाही झाली कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : देशात आतापर्यंत १२५ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर तीन मृत्यू झाले आहेत. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता सेलिब्रेटी देखील विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर झालाय. यामुळे या व्हायरसचा सामना संपूर्ण जग करतंय. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना करोना विषाणूपासून वाचण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.

तर दुसऱ्या बाजूला टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीनंतर जेम्स बाँड फेम अभिनेत्री ओल्गा क्युरलेन्को हिलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः ओल्गाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. तसेच या विषाणूला गांभीर्याने घ्या असाही संदेश तिने यावेळी दिला. ओल्गाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिला करोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. ओलेगाने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्ड सिनेमात काम केले होते.

दरम्यान,कोरोनामुळे मनोरंजन विश्वालाही मोठा फटका बसला असल्याचं दिसून येत आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचं परदेशी होणारं चित्रीकरण रद्द झालं आहे. राज्यातील विविध भागात चित्रपटगृह बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडला ८०० कोटींचा फटक बसला असल्याचं वृत्त मुंबई मिररनं प्रकाशित केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!