तुळजापूर : मान्सुन आगमनाबाबत हवामान खात्याने जाहीर केलेल्या खोट्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय शारीरिक आणि मानसिक ञास झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तातडीने पाच लाख रुपये देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
‘उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत, म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय’
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हवामान खात्याने यंदा प्रदूषण नसल्याने पाऊस पडेल असे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करुन,कर्ज काढुन शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. माञ पावसाने ओढ दिली व बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तरी या नुकसानीस हवामान खात्यातील जबाबदार व दोषी अधिकाऱ्यांवर हवामान अंदाजाची खोटी हवामानची माहीती देऊन फसवणूक करणे,जीवनाश्यक व अन्नधान्य व शेती नुकसान करुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे व परदेशी शक्तींना मदत करणे,शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त करणे तसेच मनुष्य वधाचा सदोष गुन्हा दाखल करुन नुकसानीची रक्कम व त्यांच्या पगार व संपत्ती जप्त करावी अशी मागणी केली आहे.
निवेदनात हवामान खात्यातील यापुर्वीच्या सर्व दोषी अधिकाऱ्यांची पेन्शन बंद करुन आधी दिलेली पेन्शन व पगार अदि लाभ सरकारी तिजोरीत पुन्हा जमा करुन घेऊन उत्पन्ना पेक्षा अधिक संपत्तीची चौकशी करावीअशी मागणी करण्यात आली आहे .
‘चीनच्या डोळय़ांत डोळे घालून बघणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल’
सदरील नुकसान भरपाई पंधरा दिवसाच्या आत जमा करण्यास आरंभ करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या पुढे शेतकऱ्यांचे कुठलेही अर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंञालय हवामान खाते येथील अधिकाऱ्यांना व राज्य सरकारला जबाबदार धरण्यात यावं अशी मागणी केली आहे. हे निवेदन राष्ट्रपती,पंधप्रधान,मुख्यमंत्री, हवामान खात्याचे प्रमुख अधिकारी अशा सतरा जणांना जिल्हाअध्यक्ष रविद्र इंगळे,धनाजी पेंदे,मनोहर आडेकर यांनी पाठवले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

