Share

फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं अन्यथा पडळकरांचे पुढचे कार्यक्रम होऊ देणार नाही : राष्ट्रवादी

Published On: 

पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर; ’आप’ने दिली आंबेडकरांचा आणि गांधीजींचा अवमान केल्याची आठवण करून

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. अस पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला.न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पडळकर यांच्यावर तोफ डागली. गोपी पडळकर तुझ्या असंस्कृत मुजोर व्यक्तव्याबद्दल तुला माफी मागावी लागेल. पडळकर यांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील आहेत त्यामुळे भाजपनेही जबाबदारी घ्यावी व जाहीर माफी मागावी अशी मागणी लवांडे यांनी केली आहे.

सावधान : चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

दुसरीकडे विधान परिषदेतील आमदारकीच्या निमित्ताने सध्या चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे पवारांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. ‘मी देखील अनेक वर्षे पवारांचा विरोधक होतो, पण विरोध हा वैचारिक असा वयक्तिक नाही. त्यामुळे मी देखील पवारांवर वयक्तिक टीका केली नाही.’ अस राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर गोपीचंद पडळकर यांनी आधी राजकीय सभ्यता शिकावी आणि मग बोलावे असे राजू शेट्टी यांनी पडळकर यांना सुनावलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!