Share

दाऊदच्या बायकोचे आणि माझे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या हँकरला भेटले होते फडणवीस:एकनाथ खडसे

Published On: 

मुंबई: मी मंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, माझे दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आणि ज्या हँकरने हे आरोप केले होते त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले होते, असा धक्कादायक खुलासा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. माझ्यावर खोटे आरोप करत मला बदनाम करण्यात आले.

देशातील प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली त्यावेळी माझ्यावरील आरोप सिद्ध झालेले नव्हते. अजूनही ते आरोप सिद्ध झाले नाही. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी एक वृत्तवाहिनीला बोलताना हा धक्कादायक खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि कृपाशंकर सिंह हे मध्यरात्री हँकर मनिश भंगाळेला का भेटले होते? त्याने माझे दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याच्या बातमीची ट्रायल करून दाखवली होती. मग फडणवीस त्यांना कशासाठी भेटले होते. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं अमेरिकेत निधन

दरम्यान काल एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर तोफ डागली होती. माझ्या मुलीला पाडण्यासाठी कुणी प्रयत्न केला. याचे पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल तर कडक शिक्षा करा, चुक झाली असेल तर सांगा, झोटींग समितीचा अहवाल आल्यानंतरही माझ्यावर अन्याय का? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

अधिवेशनाला जात असताना शिवसेनेच्या आमदाराला कोरोना असल्याचा मेसेज

सध्या या षडयंत्रावर मी एक पुस्तक लिहित असून त्यात सर्व बाबी पुराव्यानिशी मांडणार आहे. कोरोना संसर्ग संपल्यानंतर वरिष्ठांना सर्व दाखवेन, तरीही कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलण्याबाबत योग्य तो निर्णय घेईन असं एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा? भाजप आमदार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!