Share

बेरोजगार तरुणांच्या आंदोलनांकडे फडणवीसांनी फिरवली पाठ

Published On: 

बुलडाणा: पोलीस भरतीची जाहिरात निघत नसल्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदण यांच्या नेतृत्वात ७०० विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे. मुख्यमंत्री विदर्भ दौऱ्यावर असतांना सुद्धा त्यांनी विद्यार्थांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे चार दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते बुलडाण्यात आले असता त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली.

यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, सरकारने १२ हजार पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येवून या सरकारला चार वर्ष झालीत मात्र राज्यात कोठेही पोलीस भरती झाली नाही. पोलीस विभागात पोलीसांच्या हजारो जागा रिक्त आहे. रिक्त जागांमुळे पोलीसांवर ताण येत आहे. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करुन तातडीने पोलीस शिपाई पदाची भरती घेवून तरुणांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील बरोजगार तरुण रस्त्यावर उतरतील असा इशारा. रविकांत तुपकर यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत आक्रमक भाषण करीत सरकारवर चौफेर टिका केल्याने विद्यार्थी आक्षरश: पेटून उठले व जर या सरकारने वेळीच जागा भरल्या नाहीत तर भाजपला मतदान करायचे नाही अशी तुपकरांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!