मुंबई : ‘विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील. राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या २२ वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली होती.
दरम्यान, नवाब मलिकांच्या टीकेचा नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि मी दोघेही मुख्यमंत्री राहिलो आहोत. नवाब मलिक त्या स्पर्धेत कुठेच नाहीत. त्यामुळे त्यांनी उगाच मोठी स्वप्न पाहू नयेत’, असा टोला राणे यांनी मलिकांना लगावला आहे.
आणखी काय म्हणाले होते नवाब मलिक ?
देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू, अशी भाषा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली, हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही. भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात. या भेटीनंतर ते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करु पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केले तर…
- देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

