Share

राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या खाईत लोटणारे फडणवीस आता म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असल्याने राज्यपालांनी गृह मंत्रालयाला पत्र पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात अधिकृतरीत्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली आहे.

राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे.

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.

महात्वच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1194269568006414336?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194263492951330816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194258199051829248?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!