Share

शाहू महाराजांनंतर मुख्यमंत्र्यांनीचं मराठा समाजासाठी सर्वाधिक काम केले : विनायक मेटे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिवसंग्रामचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्वपूर्ण आसल्याच मेटे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण तर दिलेच; शिवाय समाजासाठी इतरही अनेक कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यानंतर मराठा समाजासाठी सर्वाधिक काम मुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणविस आणी समितीने आमच्या आग्रहानुसार निर्णय घेतले. टिकणारे आरक्षण देण्याची फडणवीसांची नियत होती. म्हणूनच त्यांनी अभ्यापूर्ण अहवाल तयार करुन न्यायालयात वकिलांची फौज उभी केली असेही विनायक मेटे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!