Share

आम्ही महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारकडून नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच गर्दी कमी करावी असं आवाहन वारंवार केलं जात आहे. सरकारच्या सर्व विभागांकडून कोरोनाला अटकाव करण्याचे प्रयत्न करत आहे.

आता विरोधी पक्षाचे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री यांनी आपण १००% राज्य सरकारच्या पाठीशी आहोत असं जाहीर केल आहे . कोरोना ही देशावरील आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने सामना करतोय. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलत आहे, त्याला आमचं संपूर्ण समर्थन आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच नागरिकांनी  केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.फडणवीसांनी हे आवाहन करतानाच आताची परिस्थिती हाताळण्यासाठी काही सूचना सुद्धा त्यांनी राज्य सरकारला केल्या आहेत.

रोजगारावर जे संकट आले त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!