औरंगाबाद : राज्य सरकारने राज्यातील विनाअनुदानीत अंशतः अनुदानीत प्राथमिक माध्यमातून व उच्च माध्यमिक तसेच नैसर्गिक वाढिच्या तुकड्या वरील ३३ हजार २१४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना नव्याने घोषीत झालेल्या शाळांना २० टक्के व वाढीव ४० टक्के अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचे माहिती स्वामिमानी शिक्षक संघाचे मराठवाडा अध्यक्ष गणेश सुराशे यांनी दिली.
दि.२९ जानेवारी पासुन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदानावर बेमुदत धरने आदोलन सुरु आहे. या आदोलनात राज्यभरातील २० हजार शिक्षक मैदानाव ठाण मांडुन बसलेले होते. याच आदोंलनाचा शासनावर दबाव वाढला व शिक्षण विभागाने १२ व १५ पेâब्रुवारी २०२१ ला २० टक्के तसेच ज्या शाळा या अगोदर २० टक्के अनुदान घेत होते. त्याना वाढीव २० टक्केच्या याद्या जाहिर केल्या. व १ मार्च रोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे १४० कोटीची निधीची तरतुद करुन यांचा प्रत्यक्ष निधीचा शासन आदेश १७ मार्च रोजी वितरीत करुन या शाळाचा अनुदानाचा प्रश्न जरी मार्गी लागला असला तरी राज्यातील जवळपास ४० टक्के शाळा अनुदानापासुन वंचित राहिल्या आहे.
त्याना सुद्धा त्रुटीची पुरतता करुन तसेच अघोषीत शाळा निधीसह घोषीत करण्याची मागणी कायम आहे. या पात्र शाळाना अनुदानाचा फायदा जालना जिल्ह्यातील २१५० शिक्षकाना होणार आहे. तसे भोकरदन तालुक्यातील ४२ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील जवळपास ३९५ कर्मचाNयांना याचा लाभ मिळणार असल्यची माहीती शिक्षक समन्वय संघाचे समन्वय गणेश सुरासे यांनी दिली. या आदोलनासाठी मुंबई येथे ठाण मांडुन बसलेले के.पी.पाटील गजानन खैरे, नेहाताई गवळी, दिपक कुलकर्णी, राहुल कांबळे, ज्ञानेश्वर चव्हाण, नंदु धानोरकर, कर्तारसिंग ठाकुर, ज्ञानेश्वर शेळके, जयवंत भाबड, अमोल कड, दिनेश गोगे, नारायण जाधव, इरफान शेख, सुनिल गोरे, शिवाजी वाघ, विलास जाधव असे असंख्य शिक्षक होते.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

